शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

राजनच्या चौकशीस सीबीआयला परवानगी

By admin | Published: January 20, 2016 2:44 AM

ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनची चौकशी करण्याची परवानगी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने सीबीआयला दिली.

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनची चौकशी करण्याची परवानगी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने सीबीआयला दिली. सीबीआय छोटा राजनची चौकशी दहा दिवस करणार आहे.जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनच्या चौकशीची परवानगी गेल्या सुनावणीवेळी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाकडे मागितली होती. न्या. ए. एल. पानसरे यांनी सीबीआयला दहा दिवस चौकशी करण्याची परवानगी देत, या खटल्यावरील पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. २७ जानेवारीपासून सीबीआय चौकशीस सुरुवात करेल.मंगळवारी छोटा राजनला तिहार कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष न्यायालयात हजर केले. छोटा राजनने आरोपपत्राची प्रत मिळाल्याची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, आरोपपत्र वाचले नसल्याने, ते वाचण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्याची विनंती छोटा राजनने न्या. पानसरे यांना केली. ११ जून २०११ रोजी जे. डे. यांची राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २०११ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात सतीश कालिया, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगवाने, विनोद अन्सारी, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया यांचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात जिग्ना वोरा या महिला पत्रकाराचे नाव समाविष्ट करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जे. डे. यांनी छोटा राजनविरुद्ध दिलेल्या वृत्ताबाबत छोटा राजन अस्वस्थ होता. त्यातच भर म्हणून वोराने व्यावसायिक वैर बाहेर काढत, जे. डे. यांची हत्या करण्यासाठी राजनला चिथावले. ४ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने छोटा राजनवरील राज्यातील सर्व केसेसवर सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची नियुक्ती केली, तर दुसरीकडे राजनने मुंबईत त्याच्या जीवाला धोका आहे, असे म्हणत, मुंबईत पाठवण्यात येऊ नये, यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली. (प्रतिनिधी)वकील नेमण्यासाठी विनंती‘मला कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. मला आठवड्यातून एकदाच बाहेर काढण्यात येते. त्यामुळे आरोपपत्र वाचण्यासाठी मुंबईत वकील नेमण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा,’ अशी विनंती छोटा राजनने न्यायालयाला केली. त्यावर न्या. पानसरे यांनी छोटा राजनला सांगितले की, ‘दिल्लीचे वकील अंशुमन सिन्हा न्यायालयात उपस्थित आहेत.’ ७ जानेवारी रोजी विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांनी राजनला वेळेत आरोपपत्राची प्रत न दिल्याने धारेवर धरले होते. ‘आता का नाही? कोणाची वाट पाहत आहात? तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आदेशाची वाट पाहता,’ असे म्हणत न्यायाधीशांनी राजनला आरोपपत्राची प्रत देण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला.