दिव्यांगांच्या राखीव डब्यात सीसीटीव्ही

By admin | Published: December 28, 2016 02:12 AM2016-12-28T02:12:27+5:302016-12-28T02:12:27+5:30

लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्या अन्य प्रवाशांवर आता वचक ठेवणे रेल्वे प्रशासनाला सहज शक्य होईल. दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही

CCTV in Divya's reserved box | दिव्यांगांच्या राखीव डब्यात सीसीटीव्ही

दिव्यांगांच्या राखीव डब्यात सीसीटीव्ही

Next

मुंबई : लोकलमधील दिव्यांगांच्या राखीव डब्यात बेकायदा प्रवेश करणाऱ्या अन्य प्रवाशांवर आता वचक ठेवणे रेल्वे प्रशासनाला सहज शक्य होईल. दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्तावच तयार केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही लागतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुरुवातीला दोन्ही मार्गांवरील प्रत्येकी ५0 महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. यानंतर आता मध्य रेल्वेने दिव्यांगांच्या डब्यातही सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकलच्या दोन डब्यांमधील एक-एक कक्ष दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असतो. परंतु गर्दीच्या वेळी या डब्यांत अन्य प्रवासी प्रवेश करतात.
राखीव डब्यांतून अन्य प्रवाशांनी प्रवेश करणे हा गुन्हा असून, त्याविरोधात लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून कारवाईही केली जाते. तरीही अनेकांकडून हा नियम पायदळी तुडवत अपंगांच्या डब्यात प्रवेश केला जातो. यात काही वेळा अन्य प्रवासी व दिव्यांग प्रवासी यात खटकेही उडतात. याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मध्य रेल्वेने दिव्यांगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील १४५ लोकलमधील २९0 डब्यांत सीसीटीव्ही बसविले जातील. प्रत्येक डब्यात दोन याप्रमाणे ५८0 सीसीटीव्ही बसविणार असून, पाच कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती त्यांनी दिली. विभागीय कार्यालयाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. (प्रतिनिधी)

- दिव्यांग प्रवासी सोडून अन्य कोणते प्रवासी प्रवास करतात यावर देखरेख ठेवली जाईल.

- बेकायदेशीरपणे प्रवास करणारे प्रवासी कोणत्या स्थानकातून डब्यात चढतात आणि उतरतात याचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई करणेही सोपे जाईल.

Web Title: CCTV in Divya's reserved box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.