कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

By admin | Published: May 19, 2016 01:38 AM2016-05-19T01:38:59+5:302016-05-19T01:38:59+5:30

कोंढवा खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Cemetery Cemetery | कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

Next


कोंढवा : कोंढवा खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली आहे. पडलेल्या सुरक्षा भिंतीमुळे येथे तळिरामांचा वावर वाढलेला आहे.
येथे सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या नजरेला पडतात. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा, राडारोडा यामुळे दुर्गंधी पसरली आहे. पत्र्याचे शेड आणि इतर साहित्याची मोडतोड झालेली आहे. पडलेल्या भिंतीमुळे पावसाचे व नाल्याचे पाणी स्मशानभूमीत शिरण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यापूर्वी भिंत बांधण्याची गरज आहे. (वार्ताहर)
हिटर नादुरस्त, लाईट बंद
अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी गरम पाण्याची सोय असलेले सौरऊर्जेवर चालणारे वॉटर हिटर नादुरुस्त झालेले आहे. येथील लाइट बंद पडल्या आहेत. मरणानंतरही किमान सुविधा उपलब्ध नसल्याने अंतिम संस्कारांसाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. महापालिकेकडे निधी पडून असूनही स्मशानभूमीची सुधारणा करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याची दुरुस्ती करण्याची मागणी बी. एम. प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब मस्के यांनी केली आहे.

Web Title: Cemetery Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.