चांदवडला संशयित रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:23 PM2020-05-05T22:23:38+5:302020-05-05T23:19:24+5:30
चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरच प्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
चांदवड : ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची तालुकास्तरावरच
प्राथमिक तपासणी व नोंदणी होऊन सौम्य व मध्यम स्वरूपाचे लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर येथे उपचार होणार असून, तीव्र लक्षणे आढळल्यासच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
येथील कोविड केअर सेंटरला चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांची भेट घेतली तसेच तालुक्यातील देवरगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकांशी वैद्यकीय तपासणीसंदर्भात माहिती घेतली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांच्यासोबत कोरोना सेंटर तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत माहिती घेतली.
चांदवड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. आहेर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, प्रशांत ठाकरे, शरद ढोमसे, प्राचार्य डॉ. अजय दहाड, डॉ. राजपूत, डॉ.जांगडा, डॉ. चिरलेले, डॉ. यादव, दादाभाऊ अहिरे, नवनाथ गांगुर्डेे, शिवाजी ठाकरे, गोटू वाघ, विप्लव कासलीवाल, काशीफ खान, किशीर कोकणे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
-------------------------------
रास्त भाव दुकानदारांना मुभा देण्याची मागणी
प्रधानमंत्री गरीब योजना व अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थींच्या शिधापत्रिकाधारकाचा पास मशीनवर अंगठा न घेता त्याचा आरसी नंबर घेण्याची रास्त भाव दुकानदारांना मुभा देण्यात यावी, अशी मागणी स्वस्त दुकानदार संघटनेने आमदार डॉ. आहेर यांच्या कडे केली व मोफत धान्यसंदर्भात दुकानदारांसमवेत आमदार डॉ.आहेर यांनी चर्चा केली.