पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पात्रता ( सेट) परीक्षेच्या तारखेत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:48 PM2019-12-26T18:48:27+5:302019-12-26T18:50:44+5:30
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एका परीक्षा देणे शक्य होणार नाही.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २१ जून २०२० ऐवजी आता २८ जून २०२० रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या १ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेतली जाते.दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. विद्यापीठातर्फे ३६ वी सेट परीक्षा येत्या २१ जून रोजी घेतली जाणार असल्याचे बुधवारी प्रसिध्द करण्यात आले होते. परंतु,सीएसआयआर युजीसी नेट परीक्षा येत्या २१ जून २०२० रोजीच होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एका परीक्षा देणे शक्य होणार नाही. ही बाब विचारात घेवून विद्यापीठाने सेट परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे सेट परीक्षा एक आठवडा उशीरा घेण्यात येणार आहे.
सेट परीक्षेबाबतची सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.