छत्रपती शाहूंचा बाबासाहेबांवर प्रभाव

By admin | Published: May 21, 2016 01:51 AM2016-05-21T01:51:51+5:302016-05-21T01:51:51+5:30

आंबेडकर यांच्यावर छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पगडा असल्याचे वेळोवेळी दिसले, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे केले.

Chhatrapati Shahu's influence on Babasaheb | छत्रपती शाहूंचा बाबासाहेबांवर प्रभाव

छत्रपती शाहूंचा बाबासाहेबांवर प्रभाव

Next


चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शाहूमहाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आंबेडकर यांच्यावर छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पगडा असल्याचे वेळोवेळी दिसले, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे केले.
चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते ऋषी जगताप (चिंतामणी पुरस्कार), अ‍ॅड. प्रीती वैद्य (जिजाऊ पुरस्कार), बलभीम पठारे (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) यांना गौरविण्यात आले. त्यानंतर ‘छत्रपती शाहूमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंध’ या विषयावरील व्याख्यानात सोलापूरकर बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सल्लागार भाऊसाहेब भोईर, सचिव गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, मधू जोशी, सतीश दरेकर आदी उपस्थित होते.
सोलापूरकर म्हणाले, ‘‘छत्रपती शाहूमहाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. डॉ. आंबेडकर बीए आॅनर्सला प्रथम आले, तेव्हा महाराज स्वत: बाबासाहेबांच्या घरी गेले. मूकनायक सुरू ठेवण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना पाच हजार रुपये दिले. यशाचे कौतुक म्हणून शाहूमहाराज आंबेडकरांना कोल्हापूरला घेऊन गेले. हत्तीवर अंबारीत बसून त्यांची मिरवणूक काढली.’’ शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कोरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
>प्रेरणास्थान : शिक्षणसंस्थांची स्थापना
डिप्रेस्ड क्लास मिशन, मिलिंद-सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना याचे प्रेरणास्थान छत्रपती शाहूमहाराजच होते. समाज शिकून पुढे यावा, यासाठी शाहूमहाराजांनी वसतिगृहे उभी केली. शिकलात की दरी कमी होईल, ही संकल्पना त्यामागे होती. आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा केलेला सत्याग्रह व त्यातून आम्हीही माणूस आहोत ही जाणीव ठेवा हा संदेश, ठिकठिकाणी पाणवठे मोकळे करण्यासाठी केलेले सत्याग्रह, पुणे करार, गोलमेज परिषद, घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांची कामगिरी याचा धावता आढावा सोलापूरकर यांनी घेतला.

Web Title: Chhatrapati Shahu's influence on Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.