अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

By Ravalnath.patil | Published: October 19, 2020 11:25 PM2020-10-19T23:25:21+5:302020-10-19T23:26:04+5:30

Uddhav Thackeray : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली.

Chief Minister Uddhav Thackeray will visit Osmanabad on Wednesday to inspect the flood-hit areas | अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (दि. २१) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 
बुधवारी उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांचा बुधवारी असा असेल दौरा...
- सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीनेने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण
- सकाळी १०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. 
- सकाळी १०.१५ वा. काटगाव काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण
- सकाळी ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. 
- सकाळी ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 
- दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव. 
- दुपारी १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव. 
- दुपारी १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

देवेंद्र फडणवीस सुद्धा नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज पूरग्रस्त भागांची पाहणी केली. ते आजपासून ३ दिवसांचा दौरा करत आहेत. देवेंद्र फणडवीस आपल्या दौऱ्याची आजपासून बारामतीपासून केली. यानंतर उद्या २० ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी २१ ऑक्टोबरला रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray will visit Osmanabad on Wednesday to inspect the flood-hit areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.