पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:30 AM2019-05-13T05:30:58+5:302019-05-13T05:35:01+5:30

दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची गरज, कामांची प्रगती याच्या जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात देत आहेत.

 Chief Minister's orders for the district tour to the Guardian Secretariat | पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next

मुंबई : राज्यात दुष्काळ निवारणासाठी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी व टंचाई आराखडा नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यांचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा अहवाल २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची गरज, कामांची प्रगती याच्या जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखडा नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी भेटीनंतर त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Web Title:  Chief Minister's orders for the district tour to the Guardian Secretariat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.