ठाणे : सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे स्थानक परिसरात लावलेल्या ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी १२ कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानक परिसरात आमदार निधीतून २०१२ मध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले होते आणि त्यासाठी आठ लाखांचा निधी खर्ची करण्यात आला होता. परंतु आता या कॅमेऱ्यांची अवस्थाच दयनीय झाली आहे. ३२ कॅमेरे बसविले असताना वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत येथे केवळ २० कॅमेरे बसविल्याचे त्यांनी सांगितले. २० पैकी १२ कॅमेरे बंद असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
स्थानक परिसरातील १२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By admin | Published: December 19, 2014 4:28 AM