‘धनगर आरक्षणासाठी एकत्र या!’

By admin | Published: March 6, 2017 05:41 AM2017-03-06T05:41:13+5:302017-03-06T05:41:13+5:30

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचा मागे पडलेला मुद्दा पुन्हा ऐरणीवर यावा

'Come together for a fair reservation!' | ‘धनगर आरक्षणासाठी एकत्र या!’

‘धनगर आरक्षणासाठी एकत्र या!’

Next


मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचा मागे पडलेला मुद्दा पुन्हा ऐरणीवर यावा, म्हणून सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन धनगर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. सरकार सत्तेवर येण्याआधी राज्यभर तापलेला मुद्दा निवडणुकीत कुठेही चर्चेला आला नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापौर निवडीची प्रक्रियाही संपत आली आहे. सोमवारपासून अधिवेशनाला सुरु होत असून धनगर आरक्षणाच्या नावावर मंत्रिपद मिळवलेल्या नेत्यांनाही या विषयाचा विसर पडला आहे. टीसच्या अहवालाची थाप मारून सरकार या प्रकरणी वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे वेगवेगळी आंदोलने करण्यापेक्षा सर्व गट-तट आणि संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता भाजपा-शिवसेनेने धनगर समाजाच्या मतांसाठी राजकारण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Come together for a fair reservation!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.