अमरावती - राज्यात आॅक्टोबर ते २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणा-या १०४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६९ थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ सप्टेंबरला मतदान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या महत्वपूर्ण निवडणुकीत महिलांचा टक्का वाढावा, यासाठी राज्य निवडणूक आयोग विशेष आग्रही आहे. या प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सहभाग राहावा, यासाठी महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किमान ५० टक्के जागा आरक्षित असल्याने सक्षम व योग्य महिला उमेदवारांना निवडणुक लढविण्यास प्रवृत्त करावे, अश्या सुचना आयोगाने दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान या विभागाकडूण तयार करण्यात आलेले बॅनर्स व भित्तीचित्र सकृतदर्शनी दिसेल, असे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये लावण्याच्या सूचना आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासोबत नैतिकताही वाढविण्यावर मोहीम राबविण्यात याव्यात. जनजागृतीसाठी पारंपारीक, कल्पक योजना, नवीन तंत्रज्ञन, सोशल मिडीया आदींचा वापर करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रास ८०० मतदार जोडण्यात येऊन संवेदनशील व अतीसंवेदनशील मतदान केंद्राची यादी तयार करून उपाययोजना करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
उमेदवारी अर्जासाठी संगणकीय प्रणाली* आयोगाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. संभाव्य उमेदवारांना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज व घोषणापत्र भरावे लागणार आहे. याची प्रिंट काढून व त्यावर स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिल्यास तो उमेदवारी अर्ज म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे.* लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतदेखील मतदारांना व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी संगणकीकृत मतदार यादी तयार करताना व्होटर स्लीप तयार करण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.
नागपूर विभागात सर्वाधिक ४२१ ग्रामपंचायतीराज्यात १०४१ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक ४२१ ग्रामपंचायती नागपूर विभागातील आहेत. कोकण विभागात १५०, नाशिक विभागात २४९, पुणे विभागात १९०, औरंगाबाद विभागात २२, तर अमरावती विभागात ९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.