‘नाणार’साठी कंपनीने स्थापन केली तज्ज्ञांची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 05:01 AM2018-09-25T05:01:24+5:302018-09-25T05:01:36+5:30
नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकºयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे.
मुंबई - नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकºयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. प्रकल्प उभारणाºया रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांनी ही समिती स्थापन केली आहे. समिती सहा महिन्यात त्यांच्या शिफारशी कंपनीचे प्रवर्तक व सरकारला देणार आहेत.
रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. तसेच सत्ताधारी शिवसेनेसुद्धा हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन केलेली समिती प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे न्यायोचित पद्धतीने संपादन करणे, प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन तसेच समस्यांचे पूर्ण निराकरण करण्यास कार्यपद्धती अर्थात रोडमॅप आदींबाबत विस्तृत अभ्यास करेल. माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ. विजय केळकर, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा. अभय पेठे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. जे. बी. जोशी व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. बी. कद्रेकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे.