टँकरला डिझेलच मिळत नसल्याची तक्रार

By admin | Published: May 19, 2016 01:57 AM2016-05-19T01:57:08+5:302016-05-19T01:57:08+5:30

पंचायत समितीच्या सभागृहात या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली

Complaint of tanker does not get diesel | टँकरला डिझेलच मिळत नसल्याची तक्रार

टँकरला डिझेलच मिळत नसल्याची तक्रार

Next


सासवड : येणाऱ्या खरीप हंगामासाठी शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीचा आढावा आणि टंचाई बैठक सासवड येथे पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये कृषी विभागातील भ्रष्ट कारभार आणि टंचाई काळात पाणी टँकरला डिझेल न मिळणे यावर प्रामुख्याने चर्चा झाली. कंद यांनी डिझेलची व्यवस्था त्वरित करू असे सांगितले. तर तालुका कृषी विभागाला कडक भाषेत सुचना दिल्या. याचबरोबर दुष्काळाचे संकट आहे त्याला सर्वांनी मिळून तोंड द्यावे असे आवाहन केले.
पुरंदर तालुक्याला जिल्हा परिषदेने झुकते माप दिले आहे, टंचाईसाठी एकट्या पुरंदरला सव्वा आठ कोटींचा निधी दिला असून
सध्या साडे तीन कोटींची विविध कामे सुरु आहेत अशी माहिती कंद यांनी दिली.
याच सभेत बापू भोर यांनी, शासनाने शेतक-यांना संपूर्ण कर्ज माफी करावी, शेती पंपांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे आणि पारगाव - माळशिरस या प्रादेशिक योजनेसाठी जिल्हा परिषदेने दिलेल्या २५ लाखांच्या मदतीबद्दल अभिनंदन करून आणखी १५ लाखांच्या मदतीची मागणी केली.
निरा बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप यांनी पूर्वीप्रमाणेच पणन विभागाकडे क्रेट आणि कांदा चाळ योजना देण्याची मागणी केली तसेच खासदार या नात्याने सुप्रिया सुळे यांनी कांदा खरेदी क्षमता वाढवावी अशी मागणी केली.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी, जिल्हा परिषदेमार्फत शेतक-यांना मिळणा-या सवलतीत नगरपालिका हद्दीतील शेतक-यांचा समावेश करावा अशी मागणी केली. तर पोपट थेउरकर यांनी, कृषी विभागाने गावनिहाय खत आणि बियाण्यांचे वर्गीकरण करावे असे सांगितले.
खरीप हंगामासाठी खत आणि बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याचे कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी सांगितले. तालुक्यात सध्या ९ शासकीय आणि ७ खासगी टँकरद्वारे दररोज ५० खेपा करून पाणी पुरवठा केला जात असून आणखी १० गावांचे प्रस्ताव आहेत असे कोकरे पाणी पुरवठा अभियंता सांगितले. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी भैरावाडी या पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील गावाला टँकर मिळावा, अपंग संघटनेचे अमोल बनकर यांनी शिवरी प्रादेशिक योजना दुरुस्तीअभावी बंद असल्याने निळूंज गावाला टँकर मिळावा, विद्यार्थी कॉंग्रेसचे संग्राम सस्ते यांनी टँकर मागणीची प्रक्रिया सोपी करावी असे सांगून साकुर्डेच्या थोपटेवाडीला ट्याकर मिळण्याची मागणी केली.
पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पुरंदर उपसातून पाणी मिळण्याची मागणी केली. यावर कंद यांनी सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन दिले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी, या सरकारचे शेतीबाबतचे धोरण आणि त्यासाठी दिलेला निधी याबाबत सर्वांना माहित असल्याने त्याबाबत न बोललेलेच बरे असे सांगितले. याबैठकीला सर्व गावांतील ग्रामसेवक उपस्थित असणे गरजेचे असताना ५५ पैकी निम्मेही ग्रामसेवक उपस्थित नसल्याचे आढळले.
किती ग्रामसेवक उपस्थित आहेत याचा आढावा घ्यावा अशी मागणी ईश्वर बागमार यांनी केली. अनेक गावांतून ग्रामसेवक वरिष्ठ पातळीवर माहिती देत नसल्याचेही निदर्शनास आले.
गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, कृषी विभागाच्या सभापती सारिका इंगळे, पं. स. सभापती अंजना भोर, तहसीलदार संजय पाटील, उपसभापती अनिता कुदळे, जि. प. सदस्य गंगाराम जगदाळे, विराज काकडे, मनीषा काकडे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, माणिक झेंडे, यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Complaint of tanker does not get diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.