विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेची मंजुरी, विजय दर्डा यांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 05:28 AM2017-09-02T05:28:28+5:302017-09-02T05:28:44+5:30

शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

 Concept of Yavatmal Municipal Council, Vijay Darda's proposal for the highest tribal proposal in Vidarbha | विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेची मंजुरी, विजय दर्डा यांची संकल्पना

विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेची मंजुरी, विजय दर्डा यांची संकल्पना

Next

यवतमाळ : शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे. त्यात पालिका होमगार्ड, एनसीसी बटालियनची मदत घेऊ शकते.
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी खासदार निधीतून ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली असून शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी हा विषय पटलावर आणला. त्याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.

Web Title:  Concept of Yavatmal Municipal Council, Vijay Darda's proposal for the highest tribal proposal in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत