कोल्हापूर : राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत सुरू राहिला. विशेष म्हणजे पुणे व सोलापूर या विभागांत ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे. राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये देय एफआरपी आहे. त्यापैकी २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. अद्याप १२७७ कोटी ४४ लाख रुपये एफआरपी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत. राज्यातील एकूण ११७ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या एकूण २९ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.एफआरपी देणारे कारखाने टक्केवारी संख्या० टक्के ११ ते ४९ टक्के ४५० टक्क्यांपेक्षा अधिक ६८१०० टक्के ११७एकूण १९०एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत.दृष्टिक्षेपात यंदाचे साखर उत्पादन, लाख टनात विभाग हंगाम हंगाम जास्त २०१९-२० २०२०-२१ कोल्हापूर २३.४१६ २७.७४ ४.३३पुणे १७.५२ २५.३३ ७.८१सोलापूर ७.१८ १६.४९ ९.३१अहमदनगर ५.८७ १६.६९ ११.०२औरंगाबाद ३.७१ ९.७० ५.९९नांदेड ३.१२ ९.४० ६.२८अमरावती ०.४१ ०.५२ ०.११नागपूर ०.५४५ ०.३९ -०.१५सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखानेपाणगेश्वर, लातूर -० टक्के, किसनवीर खंडाळा - ५ टक्के, तासगाव शुगर - २६ टक्के, किसनवीर, भुईंज - ३२ टक्के, भीमा टाकळी, सोलापूर - ४३ टक्के
राज्यातील 29 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई; ९१३ कोटींची एफआरपी थकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:32 AM