काँग्रेसनेच बाबासाहेबांना पराभूत केले - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:21 PM2018-05-25T23:21:47+5:302018-05-25T23:21:47+5:30
भाजप दलित विरोधी पक्ष नाही तर काँग्रेसच दलितविरोधी पक्ष आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५२ आणि १९५४ अशा दोनवेळा काँग्रेसनेच भंडारा मतदारसंघातून पराभूत केले होते, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शुक्रवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते.
भाजप दलित विरोधी पक्ष नाही तर काँग्रेसच दलितविरोधी पक्ष आहे. भाजपावर संविधान तोडण्याचा आरोप होतो. परंतु मी प्रत्यक्ष सरकारमध्ये आहे. असा कुठलाही प्रयत्न कुणीही केलेला नाही. संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला. इंदू मिल, लंडनचे डॉ.आंबेडकरांचे स्मारक, दिल्लीतील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक असे अनेक निर्णय झाले आहेत. हे निर्णय भाजप दलितविरोधी नसल्याचे सिध्द करणारे असल्याचेही ना.आठवले म्हणाले.
भंडाऱ्याच्या विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्री
मागील तीन महिन्यांपासून आपण भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असून या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहोत, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरसभेत दिले. भंडारा जिल्ह्याच्या जनतेला न्याय देण्यासाठ़ीच जिल्हा नियोजन समिती ८५ कोटींवरून १४५ कोटींपर्यंत नेली असून आगामी दीड वर्षात जिल्ह्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचेही ना.बावनकुळे यांनी सांगितले.