महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 05:59 PM2021-03-27T17:59:24+5:302021-03-27T18:00:46+5:30

देशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणा

congress leader nana patole slams pm narendra modi over corona vaccine programme in india maharashtra care about pakistan | महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

Next
ठळक मुद्देदेशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणाकेंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता, पटोलेंचं वक्तव्य

"महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. सध्याच्या वेगानेच लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि इतर देशांना लस पाठवत आहेत. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित असताना ते महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला आहे. त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

"केंद्रात काँग्रेस सरकार असताना महामारीचा मुकाबला मोठ्या शिताफीने केला होता. बसस्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबवल्याने त्यावेळी महामारीवर मात करण्यात यश आले. पण सध्या केंद्रातील सरकार तसे करताना दिसत नाही. नागपूरमध्येही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनही त्यांचे काम करत आहे. नागपुरच्या आसपासच्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण तुलनेने कमी असताना नागपूरातच कोरोना रुग्ण संख्या कशी काय वाढू लागली असा प्रश्न उपस्थित करत पुलावामा स्फोटात वापरले गेलेले आरडीएक्स, अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि नागपूर कनेक्शन तसेच नागपुरात कोरोना का वाढतो याचे कनेक्शन काय आहे," अशी विचारणा पटोले यांनी केली.

रश्मी शुक्ला प्रकरणीही भाष्य

"अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे कठपुतळी बनू नये, त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करावे. कोणत्यातरी पक्षाला समर्पित होऊन अधिकारी काम करु लागले तर ते लोकशाही तसेच प्रशासकीय व्यवस्थेलाही घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परमवीरसिंह व रश्मी शुक्ला प्रकरणी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. भाजपा व फडणवीस यांची खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका राहिली असून सुशांतसिंह प्रकरण असो वा परमबीर सिंग प्रकरण असो यातही त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले आहे असेही पटोले म्हणाले.
 

Web Title: congress leader nana patole slams pm narendra modi over corona vaccine programme in india maharashtra care about pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.