- प्रशांत ननवरे - बारामती : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजारास जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे. या काळात लागु असणाºया संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय दुकाने,उद्योग कंपन्या बंद आहेत.त्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे.शासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवु नये,अशा सुचना दिल्या आहेत. घरभाडे, कर्जाचे हफ्ते देखील काही महिन्यांसाठी थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. आता शासनाने सर्वव्यवस्थापनाच्या शाळांनाविद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.वेतन न मिळणे,वेतन न कपात,उद्योग व्यवसाय बंद असल्याने सर्वजण आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.त्यातच अवघ्या एक महिन्यांवर नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे.त्यामुळे थकीत हफ्ते,घरगुती खर्च,इतर देणे आदी शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने पालकांना ग्रासले होते. मात्र, शुक्रवारी (दि ८)घेतलेल्या शासन निर्णयामुळे पालंकाना दिलासा मिळाला आहे. पूर्वप्राथमिकते १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता सध्या तरी दुरझाली आहे.या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संदर्भ क्र. ५ अन्वये राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना फीसभरण्याची सक्ती करीत असल्याबाबत तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळेउपरोक्त क्र.६ च्या परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये. लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फीस जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील कलम (२१)अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शासनाने निर्णय घेतला आहे.
पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय/शिल्लक फी वार्षिक/ एकदाच घेवु नये.तर पालकांना मासिक/त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय दयावा, शैक्षणिक वर्ष२०२०-२०२१ साठी कोणतीही फी वाढ करु नये. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी जरकाही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही ,त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालाकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करावा,त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी,लॉकडाऊन कालावधीत गैरसोयी टाळण्यासाठी पालकांना आॅनलाईन फी भरण्याचा पर्याय देण्याची सुचनादेण्यात आली आहे.