Corona Effect : शिखर शिंगणापूर, पंढरपूरची चैत्री यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:31 AM2021-04-16T06:31:56+5:302021-04-16T06:32:20+5:30
चैत्री यात्रेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली.
सोलापूर-सातारा : येत्या ३० एप्रिलपर्यंत मंदिरे बंद ठेवण्यात येणार असल्याने याकाळात २३ एप्रिल रोजी पंढरपुरात होणारी चैत्री वारी मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. तर शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथील श्री शंभू महादेवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. चैत्री यात्रेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत चैत्री एकादशी प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करण्याबाबत निर्णय झाला. तथापि, श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान या पोर्टलवर ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
- १०० कोटींची उलाढाल असलेल्या या दोन्ही यात्रा रद्द झाल्यामुळे व्यवसायिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.