लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ५९४ व्या लसीकरण सत्रात एकूण ३३,०४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २६,५२२ जणांना पहिला तर ६,५२२ जणांना दुसरा डाेस देण्यात आला.
५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ४५ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३,८१२ लाभार्थ्यांना पहिला डाेस देण्यात आला. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील १२,२९९ जणांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ३१,९६४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर १,०८० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७७२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून आतापर्यंत एकूण १२,६६,१०८ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली.
लसीचा दुसरा डोस घेण्यात आघाडीवर असलेले जिल्हेमुंबई - २३ हजार ८४०ठाणे - १७ हजार ६४१पुणे - १३ हजार ८०५
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणजिल्हा ४५ ते ६० ६० हून अधिक एकूणमुंबई २०६८ ५३० २५९८नागपूर १७० २०७२ २२४२ठाणे २४२ १८३६ २०७८नाशिक ११४ १०९४ १२०८
आतापर्यंत लसीकरणात आघाडीवर असलेले जिल्हेजिल्हा लाभार्थीमुंबई २ लाख २५ हजार २१५पुणे १ लाख २६ हजार ६६३ठाणे १ लाख १३ हजार ३४६जिल्हा लाभार्थीनागपूर ६० हजार ९०२नाशिक ५७ हजार ३४३