CoronaVirus News: दिवसभरात आढळले १२,१३४ कोरोनारुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:14 AM2020-10-10T03:14:29+5:302020-10-10T03:14:41+5:30
आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६३ टक्के आहे.
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल १२,१३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात दिवसभरात कोरोनाचे १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६३ टक्के आहे. राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर २.६४ टक्के आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६ हजार १८ एवढी आहे.
मुंबईत २२८७ रुग्ण, ४७ मृत्यू
कोरोना रुग्ण संख्येतील वाढ आॅक्टोबर महिन्याही कायम असून शुक्रवारी दिवसभरात २२८७ बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.०५ टक्के एवढा आहे. दिवसभरात २३४७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ८४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ९३४० झाला. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २३,०८६ सक्रिय रुग्ण आहेत.