CoronaVirus दिलासादायक! 24 तासांत जेवढे कोरोनाग्रस्त सापडले, त्याच्या निम्मे बरे झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:03 PM2020-05-04T23:03:36+5:302020-05-04T23:04:07+5:30
राज्यभरात 24 तासांत 771 कोरोनाग्रस्त सापडले; 35 जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईची चिंताजनक आकडेवारी समोर आलेली असताना आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आली आहे. राज्यभरात 24 तासांत 771 कोरोनाग्रस्त सापडले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण ३५० जण बरे झाले आहेत. आजपर्यंत २४६५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४,५४१ झाली आहे. आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे.
आजपर्यंत राज्यातून २४६५ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १,९८,०४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,००६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आज दिवसभरात एकट्या मुंबईमध्ये ५१० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात एकूण ४३६ संभाव्य कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर १०४ जण बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. मुंबईत आज १८ जणांचा मृत्यू झाला असून कालच्यापेक्षा हा आकडा कमी आहे. एकूण मृत्यूंची संख्या ३६१ वर गेली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चिंताजनक! मुंबईत आज दिवसभरात ५१० रुग्णांचे निदान; १८ मृत्यूंची नोंद
बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला