मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, सखोल विश्लेषण, राजकारण आणि प्रशासन यांची बित्तंबातमी देण्यात अग्रेसर असलेल्या लोकमतने जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या घेतलेल्या व्रताची पावती मिळाली आहे. इंडियन रीडरशिप सर्वेक्षणात लोकमतने २.२० कोटी वाचकांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन रीडरशिप सर्वेक्षण अहवालाच्या शेवटच्या तिमाहीत 2.20 कोटी लोकांनी लोकमतला पसंती दिली आहे.समाजातील उच्चभ्रू वाचक गटातही लोकमतला पहिली पसंती आहे. या गटातील 76.89 लाख वाचक लोकमतचे आहेत.महाराष्ट्रातील ६७ टक्के लोकमतचे वाचक हे त्यांची किमान १५ ते ३० मिनिटे आपल्या आवडत्या वृत्तपत्रासाठी देतात. हा आकडा एकूण १.४७ कोटी पर्यंत आहे. माहितीची अनेक माध्यमे उपलब्ध असताना वाचकांनी दाखवलेल्या या विश्वासाने लोकमतची विश्वासार्हता आणि मुद्रित माध्यमाची वाचकप्रियता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.एकट्या लोकमतची वाचक संख्या ही नंबर २ आणि नंबर ३ असलेल्या वृत्तपत्रांच्या एकूण वाचकसंख्येच्या जवळ जाणारी आहे.शहरी व ग्रामीण भागात लोकमत आघाडीवर लोकमतचे शहरी भागात १.११ कोटी आणि ग्रामीण भागात १.०९ कोटी वाचक आहेत.
coronavirus: महाराष्ट्रामध्ये लोकमतच नंबर १, इंडियन रीडरशिप सर्व्हेचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:46 AM