CoronaVirus News : पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:57 PM2020-07-28T23:57:42+5:302020-07-28T23:58:20+5:30
नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई सोबत लढू आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असे पवार म्हणाले.
मुंबई - पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशाने काम करणार असून कंटेन्मेंट झोनमध्ये घराघरात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी ठरलेल्या वेळेत पार पाडली जाणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, तसेच त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सायंकाळच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने एक विशेष बैठक घेण्यात आली होती. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीच केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सहभागी झाले होते. याशिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आदी अधिकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही पुण्यातील एकंदरिक कोरोना स्थिती आणि उपाय योजनांसंदर्भात माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील स्थितीसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, "पुण्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याला भेट देणार आहेत."
यावेळी, विभागीय आयुक्त आणि जिल्ह्याधिकारी, तसेच महापालिका आयुक्त आणि काही मुख्य अधिकारी नियमितपणे पत्रकार परिषद घेतील. आपण नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई सोबत लढू आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असेही अजित पवार बैठकीदरम्यान म्हणाले.
या बौठकीत, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सहकार्य मिळत असल्याचे सांगत, राज्य सरकाने केंद्राकडे मागणी केल्याप्रमाणे व्हेन्टीलेटर्स मिळावेत, प्लाझ्मा थेरेपीसंदर्भातील त्वरित मंजुरी मिळावी, जीवरक्षक औषधे उपलब्ध व्हावीत, पुण्यातील रुग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण कमी व्हावा यासाठी संरक्षण दलाच्या रुग्णालयांतील डॉक्टरांचे सहाय्य मिळावे, यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या -
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर