मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारनं सुरू केले आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून महसूल वाढवण्यासाठी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी परिस्थितीनुसार दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला जावा, असा सल्ला दिला आहे.लॉकडाऊनचा तिसरा टप्पा कालपासून सुरू झाला. या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानं काल सकाळपासूनच दारूच्या दुकानांबाहेर रांगा लागल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. “केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!”, असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा
CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना
Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार