Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:01 AM2021-10-12T10:01:23+5:302021-10-12T10:03:41+5:30

Coronavirus in Maharashtra: सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

Coronavirus: Most active patients in five districts of the state, Pune lead, Mumbai, Thane most active patients | Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण

Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण

Next

मुंबई : राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने घट झाल्याची दिलासादायक बाब कोविड रुग्णसंख्येवरुन स्पष्ट दिसत आहे.  राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी तीन लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्ण होते. ही संख्या २२ एप्रिल २०२१ मध्ये दुप्पट होऊन ६ लाख ९९ हजार ८५८ वर पोहोचली; मात्र आता एप्रिलनंतर या संख्येत घट होऊन ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३३ हजार १५९ वर पोहोचली.

राज्यात सक्रिय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. त्यानंतर दरदिवशी १० हजारांच्या दरम्यान रुग्णसंख्या होती; मात्र आता ऑगस्टनंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या थेट दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान आहे. सध्या राज्यात ३३ हजार १५९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पाच जिल्ह्यांत अजूनही चिंता कायम असून पुणे गेल्या दोन महिन्यांपासून अव्वल यादीत आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर अहमदनगर, ठाणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. या पाच जिल्ह्यांतून ७४ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे.

राज्यात २% रुग्ण व्हेंटिलेटरवर 
आतापर्यंत ३३ हजार ४४९ सक्रिय रुग्णांपैकी २.७४ टक्के म्हणजेच ९२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर जवळपास ६.५४ टक्के आयसीयूमधील रुग्ण असून २,२०५ एवढे आहेत तर ५,४५४ गंभीर रुग्ण असून याचे प्रमाण १६.२१ टक्के आहे तर ५६ टक्क्यांहून अधिक लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. 

राज्यात आठ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लस
आतापर्यंत राज्यात एकूण ८ कोटी ७७ लाख २३ हजार ६२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात १२ लाख ९३ हजार ६२८ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ९६ हजार ८५७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Read in English

Web Title: Coronavirus: Most active patients in five districts of the state, Pune lead, Mumbai, Thane most active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.