मुंबई : राज्यात संचारबंदीचे नियम लागू झाल्यानंतरही कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ६१ हजार ६९५ रुग्ण आणि ३४९ मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ लाख ३९ हजार ८५५ झाली असून बळींचा आकडा ५९ हजार १५३ इतका आहे.
सध्या राज्यात ६ लाख २० हजार ६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात मागील २४ तासांत ५३ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २९ लाख ५९ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर १.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ८७ हजार ४८७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार २७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.