मुंबई : सोशल डिस्टन्सिंग पाळले तर राज्यात दारूची दुकाने सुरू होऊ शकतात, असे विधान सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असले तरी दारू दुकाने वा उत्पादन सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागासमोर तूर्त नाही.विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नाही. लॉकडाउनच्या काळात ही दुकाने उघडण्याची शक्यता त्यामुळे मावळली आहे. सूत्रांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत दारू दुकाने सुरू करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. ही दुकाने सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका केंद्राला वाटते.
CoronaVirus: ‘दारूविक्री सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:41 AM