मुंबईः राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून, मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं असून, शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, जमल्यास कमीत कमी वापरावा असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे, मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करून द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे. राज्यात कोरोनानं 63 जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या 52 होती आता ती थेट 63 झाली आहे. या नवीन रुग्णांत 10 मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक 8 आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. काल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टेस्टिंगची सुविधा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा मी पवारसाहेबांना सांगितला होता, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.पवारसाहेब केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोलले आहेत. कुठल्याही परिस्थितीत राज्यातील टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या रुग्णालयात आम्ही टेस्टिंग सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आयसीएमआरआयच्या नियमावलीत आम्ही बसत असू, तरच आम्हाला परवानगी द्या, असंसुद्धा आम्ही डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं आहे. आम्ही तुमचे सर्व नियम पाळू, फक्त आम्हाला परवानगी द्या आणि किट्स द्या, त्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका, असा केंद्राकडे आग्रह धरलेला आहे. पूर्वी फक्त कोरोनाच्या तपासणी करण्यासाठी तीन प्रयोगशाळा होत्या, आता जवळपास त्यांची संख्या सातवर गेलेली आहे. या टेस्टिंग लॅबची संख्या 12 ते 15पर्यंत व्हायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’
MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ
Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न