Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९८५ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:56 PM2021-04-28T21:56:33+5:302021-04-28T21:59:02+5:30
राज्यात पुन्हा मृत्यूंच्या संख्येत झाली वाढ. गेल्या काही दिवासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तितकीची घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात राज्यात ६३,३०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ९८५ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६३,३०९ नवे कोरोनाबाधित सापडले. तर दुसरीकडे ६१,१८१ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ६,७३,४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८३.४ टक्क्यांवर आला आहे.
#COVID19 | 985 deaths, 63,309 new cases reported in Maharashtra today; case tally reaches 44,73,394 pic.twitter.com/kw6TVcbqHt
— ANI (@ANI) April 28, 2021
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 28, 2021
२८ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण -४९६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-५३००
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,६०४०१
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८७%
एकूण सक्रिय रुग्ण-६५५८९
दुप्पटीचा दर- ७४ दिवस
कोविड वाढीचा दर (२१ एप्रिल-२८ एप्रिल)- ०.९३%#NaToCorona
मुंबईत ५,३०० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या चोवीस तासांत ४,९६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करणअयात आली आहे. तर दुसरीकडे ५,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत ५,६०,४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या ६५,५८९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७४ दिवसांवर पोहोचला आहे.