मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत कोरोनाची स्थिती गंभीर होत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता 'प्लॅटफॉर्म तिकीट' देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (cr railway decided to stop issuing platform tickets on some stations to prevent spread of corona)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थलांतरित कामगार दाखल होत असून, यात दिवसागणिक भरत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कामगारांना सोडण्याकरिता येणाऱ्यांमध्येही वाढ होत असल्यामुळे रेल्वेकडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक
कोणत्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद?
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव मित्तल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवर आता यापुढे प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. मात्र, ही बाब खरी नाही. कोणीही अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नयेत. तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच मे महिन्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी जाणाऱ्या आणखी काही रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, फक्त कन्फर्म्ड तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात असून, प्रवाशांनी सर्वांनी मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावेत, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. कित्येक किलोमीटर पायी चालत हे अंतर पार करावे लागले. गेल्या वर्षी बांद्रा टर्मिनसबाहेर दोन वेळा लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार, या अफवेमुळे गर्दी उसळली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामध्ये अनेक कामगारांचा समावेश होता. ती भीती आजही कायम आहे.