ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मराठी, हिंदू सण संपवण्याचं कारस्थान सुरु आहे या आरोपाचा मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. मुंबईत मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गैरवापर होत असेल तर, अॅट्रोसिटीचा कायदा रद्द करण्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
जातिनिहाय कायदे कशाला हवेत ?, आरक्षण आर्थिक निकषांवर हवं असे राज म्हणाले. मुंबईत वाहतूक पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत कायद्याचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
बलात्कार रोखण्यासाठी सौदी अरेबियासारखे कठोर कायद्याची आवश्यकता आहे. कठोर कायदे नसल्यामुळे बलात्काराचे गुन्हे सर्रास घडतात असे ते म्हणाले. दहीहंडी उत्सवासंबंधी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना त्यांनी हिंदू सण, उत्सव संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता.