Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:27 PM2020-06-09T17:27:29+5:302020-06-09T17:35:48+5:30

ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे.

Cyclone Nisarga: BJP MLA Prasad Lad Targeted Shiv Sena & CM Uddhav Thackeray over Konkan issue | Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणातील जनतेला शिवसेनेने गृहित धरलं आहेजोपर्यंत तुम्ही लोकांना भेटत नाही तोपर्यंत त्यांचे दु:ख कळणार नाहीतपालकमंत्री, एकनाथ शिंदे येऊन फक्त तहसिलदार, तलाठ्यांना भेटून गेले

मुंबई – निसर्ग चक्रीवादळामुळेकोकणाचं प्रचंड नुकसान झालं. ठाकरे सरकारने कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अतिशय मन हेलावून टाकणाऱ्या घटना कोकणात पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीत कोकणाला फक्त ७५ कोटी रुपये दिले आहेत त्यातून जे नुकसान झालं आहे त्यातून जी झाडे पडली, घरं कोसळली ती साफ करण्यासाठीही तेवढे पुरणार नाहीत अशी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केली आहे.

त्याचसोबत ज्या बाळासाहेब ठाकरेंवर कोकणवासियांनी प्रेम केले. त्यांची शिवसेनेने दिशाभूल केली त्यांना फसवलं आहे असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री, एकनाथ शिंदे येऊन फक्त तहसिलदार, तलाठ्यांना भेटून गेले, गावकऱ्यांना भेटले नाहीत, कोकणातील जनतेला शिवसेनेने गृहित धरलं आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांना भेटत नाही तोपर्यंत त्यांचे दु:ख कळणार नाहीत. कोकणातील जनता म्हणजे शिवसेनेची मालमत्ता आहे अशाप्रकारे वागत आहेत असा घणाघातही प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर केला आहे.

तर कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, राज्य सरकारने तात्पुरती जी मदत दिली ती तोकडी आहे. कोकणावर शिवसेनेने कायम प्रेम केले, त्यामुळे किमान ५०० कोटी रत्नागिरीला, ८०० कोटी रायगडला तर सिंधुदुर्गाला १०० कोटींची मदत करण्यात यावी, ज्या कोकणातील माणसांनी तुमच्यावर भरभरुन प्रेम केले त्यांच्यावर मेहेरबानी करा, मच्छिमारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर करावी अशा विविध मागण्या आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारकडे केली.

दरम्यान, मच्छिमार करणारे कोळी समाज हा मुंबईचा आत्मा आहे, त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करा, शैक्षणिक, पर्यटन व्यवसायासाठी मदत करावी, याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आलं आहे. कोविड १९ ची लॅब रत्नागिरीत व्हावी अशी मागणी आम्ही केली, त्यानंतर ३ महिन्यांनी सरकारला जाग आली, जर या सरकारने आमची भूमिका मान्य केली नाही तर जनतेसाठी, कोकणासाठी आम्ही राज्य सरकारशी दोन हात करण्याचीही तयारी केली आहे असा इशारा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण...

मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल

कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?

Web Title: Cyclone Nisarga: BJP MLA Prasad Lad Targeted Shiv Sena & CM Uddhav Thackeray over Konkan issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.