हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन डॉ. श्रीकांत दातार आज Lokmat Talks मध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:23 AM2021-09-08T08:23:57+5:302021-09-08T08:24:40+5:30
Dr. Shrikant Datar in Lokmat Talks today : भारतीय वंशाचे डॉ. श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन आहेत.
मुंबई : लोकमत मीडिया समूहाकडून 'Lokmat Talks' हा नवीन प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. ज्यामध्ये विविध क्षेत्रातातील मान्यवरांचे विचार मांडले जाणार आहे. डॉ. श्रीकांत दातार ज्यांनी आपल्या कार्यामुळे मराठी पताका परदेशात फडकवली आणि जगभरातील विद्वानात अतिव आदराचे स्थान कमावले.
भारतीय वंशाचे डॉ. श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन आहेत. त्यांची मुलाखत लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा हे घेणार आहेत. ही मुलाखत बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कूलला ११२ वर्षांचा इतिहास आहे. डॉ. श्रीकांत दातार हे सलग दुसरे मूळ भारतीय वंशाचे डीन आहेत. याआधी, नितीन नोहारिया यांनी दशकभरापासून डीनपदी सेवा दिली होती. विशेष म्हणजे, भारत सरकारकडून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी डॉ. श्रीकांत दातार यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डॉ. श्रीकांत दातार हे १९७३ चे पदवीधर आहेत. डॉ. श्रीकांत दातार यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून डिस्टिंक्शनसह बीएचे शिक्षण पूर्ण केले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) मिळवलेली आहे. तसेच, डॉ. श्रीकांत दातार यांनी सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. याशिवाय, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी बिझनेसमध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.