शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

‘सनातन’ला देशद्रोही घोषित करा

By admin | Published: September 19, 2015 12:36 AM

बंदीही घाला : शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीची मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड हा संशयित आरोपी ‘सनातन’ संस्थेचा साधक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या संस्थेला देशद्रोही संघटना म्हणून घोषित करून बंदी आणावी, अशी मागणी शुक्रवारी शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.स्मिता पानसरे यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले आहेत. त्याचबरोबर ‘सनातन’च्या लिखाणाची पद्धत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विरोधी आहे.चंद्रकांत यादव म्हणाले, ‘सनातन’चे काम हे संविधानविरोधी असून, ते लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळे या संस्थेवर बंदी घातली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन या संदर्भात विधिमंडळ सभागृहात प्रश्न मांडण्याची मागणी करू.नामदेव गावडे म्हणाले, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.गिरीष फोंडे म्हणाले, ‘सनातन’ला देशद्रोही घोषित करून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात या संस्थेच्या पुस्तक स्टॉल्सवर बंदी घालावी.निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्मिता पानसरे म्हणाल्या, आतापर्यंत आम्ही सनातन संस्थेबाबत आक्षेप घेत होतो. परंतु, आता पोलीस प्रशासनाने या संस्थेच्या कार्यकर्त्यालाच अटक केल्याने ते स्पष्ट झाले आहे. या संस्थेचा कारभार हा काही मूठभर हिंदंूचे हित साधणारा आहे. धर्मभोळ्या व देवभोळ्या हिंदू समाजातील लोकांची माथी भडकाविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. बहुजनांचे केवळ धड असून, माथी ही दुसऱ्याचीच आहेत. परंतु, येथून पुढील काळात बहुजनांच्या धडावर बहुजनांचीच डोकी राहतील, यासाठी रस्त्यावरची धारदार लढाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन पाहता त्यांची विचारधारा ही ‘सनातन’सारखीच असल्याने त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, ज्येष्ठ नेते पानसरे हे आमच्यासाठी आदरनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्याचे वकीलपत्र कोल्हापूरसह सहा जिल्ह्णांतील वकील घेणार नाहीत. या संस्थेवर बंदी घालून राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा.शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, बन्सी सातपुते, शिवाजीराव परुळेकर, संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, आशा कुकडे, उमेश पानसरे, तौफिक मुल्लाणी, मधुकर माने, अण्णा मालेकर, रियाज शेख, प्रदीप कवाळे, दिलदार मुजावर, जमीर शेख, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)निवेदनातील मागण्या ...पानसरे यांच्या हत्येचा तपास त्वरित करून समीर गायकवाडच्या मागील सूत्रधार, संस्था व राजकीय प्रेरणा यांचा तपास करून कडक शिक्षा द्यावी.खुनाचा तपास राजकीय हस्तक्षेपविरहित व शहीद हेमंत करकरेंच्या कार्यपद्धतीने व हायकोर्टाच्या निगराणीखाली व्हावा.यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची राज्य सरकारने बदली करून तपासात हस्तक्षेप केला आहे. आता तपासात गती घेतली असताना त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास असंतोष निर्माण होईल.बहुसंख्याक धर्माच्या नावाने राज्यघटनाविरोधी कारवाया करून सहिष्णू भारतीय संस्कृतीला बदनाम करणाऱ्या हिंदू जनजागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, श्रीराम सेना, शिवप्रतिष्ठान, दुर्गा वाहिनी या संघटनांबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी.