नाशिकच्या लाचखोर अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’, धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:13 AM2017-10-17T04:13:26+5:302017-10-17T04:13:49+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या तीनपैकी एका अभियंत्याचे ‘राजकीय कनेक्शन’ उघड झाले असून तक्रार मागे घेण्यासाठी संबधितांच्या निकटवर्तीयांकडून धमकी देण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. तर चौकशीत राजकीय राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे सांगत सखोल तपासाची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात केली आहे.
शासकीय ठेकेदार युवराज पुंडलिक मोहिते यांच्या घरी जाऊन संबंधित अभियंत्यांचे राजकीय हितचिंतक व गुंडप्रवृत्तीचे लोक तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत़ माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असून, पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी तक्रारदाराने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे केली आहे़ दोन वर्षांपासून केलेल्या वेगवेगळ््या कामांची त्यांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत.
धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून माझ्याकडेही अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे सत्ताधारी पक्षातील उच्च पदस्थांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधी, अधिकाºयांकडून तपासात अडथळा, दबाव आणला जात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. ''
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
ंअटक केलेले कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे महापौर रंजना भानसी यांचे बंधू दिलीप राऊत यांचे जावई आहेत. त्यातच एका भाजपा आमदारानेच त्यांची नाशिकमध्ये बदली केली होती, अशीदेखील चर्चा आहे. सत्तारूढ भाजपाशी संबंध बघता सदरचे प्रकरण दडपण्याचा प्र्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुख्य अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलनही केले.