साई संस्थानच्या तूप खरेदीत घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:36 AM2018-01-12T01:36:16+5:302018-01-12T01:36:25+5:30
साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी शिर्डीत पत्रकार परिषदेत केली.
शिर्डी : साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी शिर्डीत पत्रकार परिषदेत केली.
लोखंडे म्हणाले, की संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीत हरियानातील एका तूप ठेकेदाराने आपल्यालाच टेंडर मिळायला हवे, असा हट्ट धरला़ यावर त्याला विचारणा केली असता त्याने आपण हे टेंडर मिळण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाºयाला व विश्वस्ताला साठ लाख रुपये दिल्याचा आरोप संस्थान अध्यक्षांकडे केल्याचे समजले आहे़ त्यामुळे आपण याबाबत मुख्यमंत्र्यांना याची सीआयडीमार्फत चौकशी करून शहानिशा करण्याची मागणी करणार आहे.
साईबाबा संस्थानला वर्षाकाठी जवळपास ३० कोटींचे गावरान तूप लागते. या साजूक तुपाचा वापर प्रसादाचे लाडू, दर्शनबारीतील मोफत बुंदी वाटप व सत्यनारायण प्रसाद तयार करण्यासाठी के जातो़ या तुपाच्या शुद्धतेबाबत अधूनमधून साशंकता व्यक्त होत असतात़
संबंधित ठेकेदाराचा तीन महिन्यांचा ठेका संपला होता़ गायीच्या तुपात म्हशीचे तूप मिसळून भेसळ केल्याप्रकरणी व्यवस्थापनाने त्यास अगोदरच अपात्र ठरविले आहे. तो संस्थानच्या विरोधात अंबाला न्यायालयात गेला आहे़ ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक बोलणे उचित नाही़
- रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी.