पुणो : शहरात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, आज डेंगीचे तब्बल 23 नवे रुग्ण, तर मलेरियाचे 4 रुग्ण सापडले आहेत.
डासांचा प्रादुर्भाव शहरात झपाटय़ाने वाढत असताना त्यांच्या नायनाटासाठी पालिकेकडून उपाययोजनाच करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे डासांच्या चाव्यामुळे डेंगी, मलेरिया आजार होण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. या महिन्यात अवघ्या 8 दिवसांत शहरात डेंगीचे 54 रुग्ण सापडले आहेत. तर, या वर्षात डेंगीच्या रुग्णांची संख्या 249 वर पोहोचली आहे. तर, मलेरियाचे या महिन्यात 5 रुग्ण सापडले असून, या वर्षात 91 रुग्ण सापडले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही या आजाराचे रुग्ण सापडू लागले आहेत.(प्रतिनिधी)