शिंदेेंकडील खाती दिली सुभाष देसाई यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:31 AM2022-06-28T07:31:39+5:302022-06-28T07:32:12+5:30
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नऊ मंत्र्यांकडील खाती शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांकडे सोपविली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अनिल परब यांच्याकडे. दादा भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज पाटील (राज्य उत्पादन शुल्क) राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज पाटील, (अन्न व औषध प्रशासन), आदिती तटकरे, (सांस्कृतिक कार्य)
अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य). बच्चू कडू यांची खाती (कंसात) आदिती तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज पाटील (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे (महिला व बाल विकास), दत्ता भरणे (इतर मागास बहुजन कल्याण)