कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास : मुख्यमंत्री

By admin | Published: February 10, 2017 04:51 PM2017-02-10T16:51:08+5:302017-02-10T16:51:08+5:30

विदर्भातील सहा जिल्ह्यासह बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टयाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्प तयार करण्यात आला असून...

Development of four thousand villages in Vidarbha due to agro-processing project: CM | कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास : मुख्यमंत्री

कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास : मुख्यमंत्री

Next

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि.10 - विदर्भातील सहा जिल्ह्यासह बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टयाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्प तयार करण्यात आला असून त्याला जागतिक बँकेकडून ५ हजार कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गंत नवीन पीक पध्दत पॅटर्न, जलसंधारण व जलयुक्त शिवार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्याचा फायदा विदर्भातील चार हजार गावांमधील  शेतकºयांना होणार असून त्यांची खारपाणपट्टयातून मुक्तता होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्थानिक लहाने ले-आऊट येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ १० फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, विश्वनाथ माळी, श्वेता महाले, विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, नंदू अग्रवाल, मोहन शर्मा, सचिन देशमुख, जि.प.सदस्य नरहरी गवई आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याचा ५० वर्षाचा इतिहास पाहिल्यास शेतक-यांना मिळाली नाही तेवढी मदत भाजपा सरकारने  गेल्या दोन वर्षात केली आहे. १७ हजार कोटी रूपयाची अप्रत्यक्ष मदत शासनाने शेतकºयांना केली असून पाणी, वीज व शेतकºयांच्या उत्पादन मालाला भाव देण्यात आला आहे. शासनाने महाराष्ट्र दुष्काळ मुक्तीचा संकल्प केला असून यासाठी राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली.

या योजनेअंतर्गंत ४ हजार गावे दुष्काळमुक्त, १२ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली असून जिल्ह्यातील जिगांवसह रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार शेततळे तयार करण्यात आले असून ६ हजार सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. दिवसा विजेची समस्या लक्षात घेता सोलर पंप प्रकल्प तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या मदतीने शेतकºयांना सोलर पंप देण्यात येणार आहे. जो पर्यंत शेतकºयांची उत्पादकता वाढणार नाही, तो  पर्यंत शेतकºयांची समस्या सुटणार नाही. यासाठी २५ हजार कोटीचा शेतकरी अर्थ संकल्प सुरू केला असून शेतकºयांना अचूक हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील गरिबांचा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न असून येणाºया दोन वर्षात गरिबांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

प्रारंभी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी शासनाने आतापर्यंत राज्याच्या विकासाचे चांगले निर्णय घेतले असून केंद्र सरकार व राज्य सरकारने विविध आराखडे तयार करून गरिबांसाठी योजना राबविल्या आहेत. भविष्यात ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविला पाहिजे, यासाठी भाजपाच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदाच्या आठ महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यात २४५ गावात भाजपाच्या शाखा स्थापन केल्या असून गावागावात केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे घाटावरील ३० पैकी २० जागा निवडून आणू, असे आश्वासन देवून यावेळी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला. आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होत नाही. भविष्यात शेतकºयांचे प्रश्न सुटले पाहिजेत, उद्योग वाढले पाहिजे, दिल्ली ते गल्ली पर्यंतचे आराखडे मंजूर झाले पाहिजेत. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून  द्या, असे आवाहन केले.

कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर म्हणाले की, मागिल ७० वर्षात ग्रामीण भागात कोणताच विकास झाला नाही, शिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्याची दूरवस्था झाली आहे. आता परिवर्तनाची लाट आली आहे. राज्य शासनाच्या दोन वर्षाच्या काळात शेतकºयांसाठी १८० कोटी रूपयांचा विमा, ३ हजार ५०० कोटी रूपयांचे दुष्काळाचे अनुदान देण्यात आले आहे.  आता शेतक-यांनी मागणी केल्यास आठ दिवसात वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार संपवून विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.

 

Web Title: Development of four thousand villages in Vidarbha due to agro-processing project: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.