शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

विकास आराखड्यात फेरबदल

By admin | Published: April 03, 2017 2:01 AM

ताथवडेगावच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने विकास आराखड्यातील काही भाग वगळला आहे

पिंपरी : ताथवडेगावच्या प्रारूप विकास योजनेस अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने विकास आराखड्यातील काही भाग वगळला आहे. विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. हे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यावर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास ३० दिवसांच्या मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील सामाजिक, मूलभूत सुविधांच्या वापरासाठी एकूण ९३७ पैकी ८५० आरक्षणे कायम ठेवली आहेत. सरकारी जागांवरील ८७ आरक्षणे उठविण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने डीपी मंजूर करताना १० टक्क्यांपेक्षा जास्त बदल केले आहेत. महापालिका हद्दीतील ताथवडे गावच्या प्रारूप विकास योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये अंतिम मंजुरी देताना राज्य सरकारने क्रमांक १ ते २८ हा भाग मंजुरीतून वगळला. या नियोजित फेरबदलासंदर्भात ६ जानेवारी २०१७ रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. या फेरबदलासंदर्भात नागरिकांकडून मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्यासाठी पुणे विभाग नगररचना सहसंचालक अविनाश पाटील यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)>सूचना आणि हरकतींसाठी महिन्यांची मुदत ताथवडे गावच्या प्रारूप विकास योजनेतील फेरबदल दर्शविणारे नकाशे राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहेत. ते नागरिकांसाठी ३० मार्चपासून पुणे विभाग नगररचना कार्यालयात, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच महापालिकेच्या विकास योजना विभागात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी ३० दिवसांच्या मुदतीत हरकती किंवा सूचना सादर कराव्यात, असे आवाहन केले आहे.