Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या दणदणीत विजयावर देवेंद्र फडणवीस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:23 PM2024-11-23T14:23:40+5:302024-11-23T14:29:38+5:30

Devendra Fadnavis Reaction mahayuti victory, Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभेच्या निकालांमध्ये महायुतीने २०० पार मजल मारल्यानंतर विजयाचे 'मॅन ऑफ द मॅच' देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis first reaction to Mahayuti record break victory maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Ek hai toh safe hai | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या दणदणीत विजयावर देवेंद्र फडणवीस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या दणदणीत विजयावर देवेंद्र फडणवीस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis Reaction mahayuti victory, vidhan sabha assembly election result 2024: राज्यात महायुतीने प्रचंड बहुमताकडे वाटचाल केलेली आहे. महाविकास आघाडीची एवढी धुळधाण उडाली की विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळणे कठीण होऊन बसले आहे. मतमोजणीच्या पहिल्या चार तासांतच २८८ जागांचे कल हाती आले. त्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने २०० पार मजल मारल्याचे चित्र दिसून आले. दुपारी २ वाजताच्या सुमारास महायुतीला २२७ तर मविआला ५३ तर इतर आमदारांना ८ जागा असा कल मिळाला. महायुतीच्या या जोरदार मुसंडीनंतर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली.

विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारसभा सुरु झाल्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतली आणि एक है तो सेफ है अशी घोषणा दिली. ही घोषणा नंतर पूर्ण प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावर भाजपा आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. पण निवडणुकीच्या निकालात महायुतीला तुफान यश मिळाले. त्यामुळे हाच धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले. "एक है तो ‘सेफ’ है!मोदी है तो मुमकिन हैं!" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

त्याआधी काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी एक इन्स्टाग्राम पोस्टही केली होती. त्यात त्यांनी हर संत कहे, साधू कहे... सच और साहस है जिसके मन में, अंत में जीत उसी की रहे। असे संतवचन लिहिले होते. त्यावर समर्थकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता. आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.


 

Web Title: Devendra Fadnavis first reaction to Mahayuti record break victory maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Ek hai toh safe hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.