देवेंद्र राजवटीस ‘इंद्र’ दरबाराचे वलय

By admin | Published: October 29, 2014 10:46 PM2014-10-29T22:46:33+5:302014-10-29T23:49:56+5:30

देवेंद्र राजवटीस ‘इंद्र’ दरबाराचे वलय; सत्ताधा-यांतील सातजणांचा समावेश.

Devendra Rajgavas 'Indra' Darbara's ring | देवेंद्र राजवटीस ‘इंद्र’ दरबाराचे वलय

देवेंद्र राजवटीस ‘इंद्र’ दरबाराचे वलय

Next

ब्रह्मनंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)

          दिल्लीत ह्यनरेंद्रह्ण आणि महाराष्ट्रात ह्यदेवेंद्रह्ण, हे मध्यंतरीच्या काळात चर्चेला आलेले समीकरण प्रत्यक्षात साकारले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्यकारणाला ह्यइंद्रह्ण दरबाराचे वलय लाभणार आहे. कारण इंद्ररूपी नामसाधम्र्य असलेल्या ११ आमदारांना जनता जनार्दनाने राज्याच्या विधीमंडळरूपी दरबारात धाडले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. नंतर अल्पावधीतच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. तेव्हापासूनच दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला. विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आणि विधीमंडळात या पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली. त्यामुळे दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, ही भाजपा कार्यकर्त्यांची घोषणा आता लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. एक विलक्षण योग म्हणजे, देवेंद्रप्रमाणेच नावात इंद्र समाविष्ट असलेले, फडणवीस यांच्याव्यतिरिक्त आणखी १0 आमदार आहेत. या दरबारात नागपूर दक्षिण पश्‍चिम मतदारसंघातून विजयी झालेले स्वत: देवेंद्र फडणविस, तसेच कल्याण पश्‍चिममधून नरेंद्र पवार, डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण, मिरा भाइंदरमधून नरेंद्र मेहता, कारंजामधून राजेंद्र पाटणी, उमरखेडमधून राजेंद्र नजरधाने, तर शिवसेनेचे जोगेश्‍वरीमधून रविंद्र वायकर यांचा समावेश राहणार आहे. भाजपाच्या या इंद्रांव्यतिरिक्त नामसाधम्र्य लाभलेले इतर पक्षाचेही चार आमदार आहेत. यात वसईमधून हितेंद्र ठाकुर, धामणगांव रेल्वेमधून विरेंद्र जगताप, सातारामधून शिवेंद्र भोसले आणि मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. ११ पैकी सात इंद्र सत्तेचा गाडा हाकणार आहेत, तर चार इंद्र विरोधी बाकावर बसणार आहेत.

Web Title: Devendra Rajgavas 'Indra' Darbara's ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.