मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिभाषण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारे असल्याची टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यपाल यांचे अभिभाषण पाहिल्यानंतर 'राम गड के शोले' नावाचा अतिशय निकृष्ट दर्जेच्या चित्रपटाची आठवण होते, असा टोला मुंडे यांनी लगावला, अभिभाषणाच्या ठराव वेळी ते बोलते होते.
राज्यपाल यांच्या अभिभाषणाची जेव्हा प्रत वाचली त्यावेळी असा आभास होईल की, एखांदा इतिहासात उत्कृष्ट चित्रपट होऊन जातो, जसा रमेश शेपिचा 'शोले' सारखा वाटतो. मात्र प्रत्यक्षात अभिभाषणानंतरची सरकारची मागील चार वर्षातील कामगिरी बघतीली तर आम्हाला, 'राम गड के शोले' नावाचा अतिशय निकृष्ट दर्जेच्या चित्रपटाची आठवण होते, असा खोचक टोला धनंजय मुंडेंनी लगावला. राज्यपाल यांचे अभिभाषण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारे असल्याचे ही मुंडे म्हणाले.
राज्यपाल यांचे भाषण हे राज्यसरकारने लिहून दिलेले होते. राज्यात सर्व ठीकठाक सुरु असल्याचा भाषण सरकारने राज्यपालांच्या तोंडी घातले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येते की , राज्य सरकार आंधळा चौकीदार आहे. अशी टीका मुंडे यांनी केली.