किशोर कुबल, पणजीसॅल्यूट घेणे आपल्याला आवडत नाही, ती ब्रिटिशांची पद्धत आम्हाला नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केले. व्हीव्हीआयपी कल्चरची मानसिकता राजकारण्यांनी बदलली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. महिला आर्थिक परिषदेसाठी ते गोव्यात आले आहेत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गरज आहे तेथे आणि जितकी गरज आहे तेवढीच सुरक्षा घेणे योग्य आहे. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने झेड प्लस सुरक्षेमुळे १५ मोटारींचा ताफा दिला. मला इतकी सुरक्षा नकोच. त्यामुळे कमी करून ताफ्यातील मोटारी पाचवर आणल्या. त्या आणखीही कमी कराव्यात, अशी मागणी आहे; परंतु पोलीस तयार नाहीत. युवा वर्गाला उद्योजकता प्रशिक्षण देण्याबाबत प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. सिडबीकडे त्यासाठी शनिवारीच करार केलेला असून २00 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.विर्डीप्रश्नी सामोपचाराने मिटवूविर्डीप्रश्न सामोपचाराने मिटवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोवा-महाराष्ट्र सीमेवरील विर्डी नदीतील पाण्यावर गोव्याचा हक्कच नाही. आम्ही गोव्याला पाण्याचा थेंबही देणार नाही, अशी ताठर भूमिका महाराष्ट्र सरकारने चार दिवसांपूर्वी म्हादई पाणी तंटा लवादासमोर घेतली होती. त्यामुळे गोव्यात नाराजीचे वातावरण आहे. उभय राज्यांमधील संबंधांत बाधा येण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. विर्डी नदीवर आठ धरणे बांधण्याची महाराष्ट्र सरकारची योजना असून ती बंद करावी, अशी गोवा सरकारची मागणी आहे.
‘सॅल्यूट’ घेणे आवडत नाही
By admin | Published: May 11, 2015 4:45 AM