सोलापूर : अण्णाभाऊ साठे महामंडळात सुमारे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची आता सीआयडी आणि एसीबी चौकशी सुरू आहे़ येत्या १५ दिवसांत याचा अहवाल मिळेल़ यामध्ये तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यासह ज्यांचा या घोटाळ््यात सहभाग आहे त्यांना गाजाआड करू, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्पष्ट केले़ शासकीय विश्रामगृहात कांबळे यांनी समाजकल्याण खात्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते़ अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ््याप्रकरणी आजवर १६ अधिकारी निलंबित झाले आहेत़ याच एका महामंडळाला त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी एवढा निधी कसा दिला, याचे गौडबंगाल आहे़ औरंगाबादमध्ये २० गुंठे जागा असताना ती २ एकर दाखविली. तिच्यावर तब्बल १६ कोटींचे बांधकाम दाखविले़ प्रत्यक्षात बांधकामाचा दर सात हजार रुपये चौरस फूट दाखविण्यात आला़ सर्व जिल्ह्यांत या महामंडळात घोटाळे झाल्याचे सिद्ध झाले़ त्यामुळे कामे थांबविण्यात आली होती़ दलित समाजाच्या निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना शासन सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली़ ‘लोकमत’ला धन्यवादअण्णाभाऊ साठे महामंडळात झालेला घोटाळा ‘लोकमत’ने सविस्तरपणे प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणला़ त्यामुळे मी ‘लोकमत’ला धन्यवाद देतो, असे कांबळे म्हणाले़
घोटाळेबाजांना गजाआड करू
By admin | Published: June 11, 2015 1:36 AM