महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरने बोलावला मांत्रिक; पुण्यात धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:42 AM2018-03-14T06:42:03+5:302018-03-14T06:42:03+5:30

अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी डॉक्टरनेच मांत्रिक बोलावल्याची धक्कादायक घटना येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडली.

The doctor said to treat the woman; Shocking type in Pune | महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरने बोलावला मांत्रिक; पुण्यात धक्कादायक प्रकार

महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरने बोलावला मांत्रिक; पुण्यात धक्कादायक प्रकार

Next

पुणे : अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी डॉक्टरनेच मांत्रिक बोलावल्याची धक्कादायक घटना येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडली. संबंधित महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने नातेवाइकांनीच एका व्हिडीओद्वारे हा प्रकार समोर आणला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
संध्या सोनवणे (२४) यांच्यावर स्वारगेट येथील डॉ़ सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या गाठीवर उपचार सुरू होते. त्यांना २० फेब्रुवारीला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे डॉ़ चव्हाण सुद्धा तपासणीसाठी येत असत. संध्या यांची तब्येत बिघडत चालल्याने डॉ. चव्हाण यांनी मांत्रिकाला बोलावून त्याच्यामार्फत उताराही केला.
हा सर्व प्रकार संध्या यांच्या नातेवाइकांनी कॅमेºयात चित्रित केला. संध्या यांचे बंधू महेश जगताप यांनी सांगितले की, डॉ़ चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मांत्रिकाला बोलावले़ त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला. जगताप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
>डॉक्टरांकडून पोलीस संरक्षणाची मागणी
धमकीचे फोन येत असल्याचे सांगून डॉ़ चव्हाण यांनी पोलिसांकडे सरंक्षणाची मागणी केली आहे़ मात्र, आपण संध्या यांना तपासत असताना एक पुजारी हजर होता, असे त्यांनी कबूल केले.
>‘व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वा मंत्र-तंत्राचा प्रकार आढळला नाही. हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला प्रवेश दिला जात नाही. नातेवाईक म्हणून रुग्णाला भेटायला कुणीही जाऊ शकतो.
- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक,
दीनानाथ हॉस्पिटल
>या प्रकाराबद्दल
रात्री उशिरा
डॉ. सतीश चव्हाण आणि उपचारासाठी बोलावलेल्या मांत्रिकावर अंधश्रद्धाविरोधी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The doctor said to treat the woman; Shocking type in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.