आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कानिटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:04 AM2021-07-07T07:04:23+5:302021-07-07T07:07:01+5:30
लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (डीसीडीआयएस, मेडिकल) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी तर बालरोगशास्त्रात एमडी पदवी प्राप्त केली आहे.
नाशिक : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर (Dr. Kanitkar) यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी ही नियुक्ती जाहीर केली.
लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (डीसीडीआयएस, मेडिकल) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी तर बालरोगशास्त्रात एमडी पदवी प्राप्त केली आहे. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
अध्यापन व संशोधनाचा अनुभव : डॉ. कानिटकर २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. त्यांना अध्यापन व संशोधनाचा २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित केले आहे.