मदत नाकारल्याने नातलग संतप्त

By admin | Published: August 2, 2016 03:46 AM2016-08-02T03:46:54+5:302016-08-02T03:46:54+5:30

गैबीनगरात इमारत कोसळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदत नाकारल्याने परिसरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Due to denial of help, relatives get angry | मदत नाकारल्याने नातलग संतप्त

मदत नाकारल्याने नातलग संतप्त

Next


भिवंडी : गैबीनगरात इमारत कोसळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदत नाकारल्याने परिसरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरकारने मदतीबाबत निर्णय घ्यायला हवा. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत द्यायला हवी, अशी भूमिका मृतांचे नातलग, जखमी आणि मित्र परिवाराने घेतली.
इमारत धोकादायक होती, हे मान्य; पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मोहम्मद वकील अहमद म्हणाले, शहरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीत माझी तीन मुले जखमी झाली आहेत. आम्ही बेघर झालो आहेत. सध्या मुलांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांकडून कपडे मागून आणून घालायची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मदत करून आम्हास सहकार्य करावे.
भिवंडी पालिकेने इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. सर्वतोपरी प्रयत्न करूनही भाडेकरूंनी आणि रहिवाशांनी तोडगा स्वीकारला नाही. त्यांंच्या हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींबाबतच पालिकेने कडक धोरण स्वीकारावे. परंतु, बेघर झालेल्यांना माणुसकी म्हणून मदत करावी, अशी भूमिका निसार अहमद यांनी मांडली.
आणखी बळी जाऊ नयेत, म्हणून धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. तेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे मत अब्दुल गफार मोहम्मद इस्माईल यांनी व्यक्त केले.
इमारत दुर्घटनेत मृत व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिकमदत मिळावी, असा आग्रह धरून मोहम्मद अली म्हणाले, अनधिकृत इमारती उभ्या राहण्यास मनपा प्रशासन अधिकारी व प्रभाग अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा
>आश्वासनानंतर जनाजा
ज्यांचे मृतदेह रविवारी रात्री ताब्यात आले, ते मिळाल्यानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी केली. गैबीपीर कबरस्तानात सर्वांचा दफनविधी करण्यात आला. तत्पूर्वी मदत मिळावी, म्हणून दुर्घटनास्थळी जनाजा थांबवण्यात आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने दफनविधीसाठी जनाजे नेण्यात आले.

Web Title: Due to denial of help, relatives get angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.