लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन होते. मात्र परिचारिकेच्या फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराबाबत तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यामुळे आम्हाला परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करता आले नाही, अशी खंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने जि.प.च्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनाचा कार्यक्रम १६ मे रोजी गुरूवारला घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एनआरएचएमचे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी डॉ. महेश गौरी, डॉ. राजे, परवीन शेख, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. शंभरकर म्हणाले. जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्यामध्ये परिचारिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्रामीण भागात परिचारिका चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा संभाळत आहेत, असे म्हणाले.पुढील वर्षी परिचारिकांना पुरस्कार देण्यासाठी टीएचओ व वैद्यकीय अधिकाºयांकडून आवर्जून प्रस्ताव मागविण्यात येतील, असे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना रामटेके, संचालन शर्मिला जनबंधू यांनी केले तर आभार छाया मानकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी चंद्रकला मडावी, मंगला चंदनखेडे, अनुसया पवार, सपना राठोड, अपर्णा पेशेट्टीवार, ज्योती काबरे, मिना वनकर, विद्या आडेपवार व इतर नर्सेसनी सहकार्य केले.
प्रस्ताव न आल्याने नर्सेसना पुरस्कार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:56 PM
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन होते. मात्र परिचारिकेच्या फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराबाबत तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.
ठळक मुद्देजि.प.मध्ये कार्यक्रम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली खंत